नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क - या नवरात्रीमध्ये संपूर्ण नऊही दिवस तुमचा उपवास असेल तर ही डायट बातमी तुमच्याकरीता आहे. उपवास म्हटला की उपवासाचे पदार्थ आणि नेहमीचा दररोजचा स्वयंपाक करणे असे वेगवेगळे जेवण बनवावेच लागते. असे सगळे पदार्थ करतांना गृहीणींची तारांबळ उडते. बहुतांशवेळा उपवास हा घरातील महिला वर्ग करत असल्याने त्यांचे खाण्यापिण्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. त्यासाठी गृहीणींनी स्वत:ची काळजी घेत हेल्दी डायट उपवास करताना या टिप्स फॉलो करा...
नवरात्रीच्या उपवासात स्वतःला निरोगी ठेवताना कोणतेही पदार्थ खातांना त्याचा अतिमारा करु नका, त्यामुळे तुम्हाला सुस्त झाल्यासारखे वाटते.
चहा, काॅफी यासारखे पेय मर्यादीत प्रमाणात घ्या. ज्यामुळे तुम्हाला ॲसिडीटी सारखे वाटणार नाही.
उपवास करताना ताजी फळे, साबुदाण्याची खिचडी, भगर, ड्राय फ्रूटस् असे आदी पौष्टिक पदार्थांसोबतच आपल्या आवडीनुसार पदार्थ खाऊ शकतात.
भरपूर प्रमाणात पाणी पिऊन शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य ठेवा. त्यामध्ये तुम्ही फळांचे ज्युसेस, आरोग्यदायी असे नारळाचे पाणी पिऊ शकतात.
राजगिराचे लाडू, राजगिरा पिठाचा शिरा, राजगिरा पिठाची भाकरी, राजगिराची चिक्की, राजगिऱ्याच्या लाह्या, भगरीचे उप्पीट, साबुदाणा थालीपीठ, साबुदाणा भगर इडली, शिंगाडा पिठाची पुरी, शिंगाडा पिठाचा गुळ घालून केलेला पौष्टीक शिरा हे पदार्थ तुम्हाला दिवसभर उर्जावान ठेवतील.
दूध, दही, ताक यांचे पेयही घ्यायला हवेच. कारण त्यामुळे तुमचे आतडेही निरोगी आणि थंड राहण्यास मदत होईल आणि ॲसिडीटी होणार नाही.